हे करून पहा – जेवणानंतर गोड पान खा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुर्वेदानुसार जेवणानंतर योग्य पद्धतीने खाल्लेले पान हे एखाद्या औषधाहून कमी नाही. तंबाखू नसलेले साधे किंवा गोड पान खाल्ले तर ते शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर असते.

पान खाल्ल्याने तोंडात लाळ तयार होण्याचे प्रमाण लगेच वाढते. या लाळेमुळे अन्न लवकर पचवण्यास मदत होते. ऑसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळतो.

गोड पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात, हिरडय़ा मजबूत ठेवण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे.