
१ ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा आणखी भार पडणार आहे. नवी कार खरेदी करणे, टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन आणि ब्रँडेड कपडे खरेदी करणे महाग होणार आहे. विविध क्षेत्रांतील कंपन्या ऑगस्टपासून उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची तयारी करत आहेत. यामुळे ग्राहकांना या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाचा तणाव, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, वाहतूक खर्चातील वाढ आणि सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये होणारा चढ-उतार यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. हा अतिरिक्त खर्च ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही महागाईचा परिणाम दिसू शकतो. मेमरी चिप आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या किमती वाढल्याने स्मार्टफोन महाग होऊ शकतात.
| उत्पादन | संभाव्य दरवाढ |
| चहा पावडर | ६ ते ८ टक्के |
| केसांचे तेल | ६ ते ८ टक्के |
| टीव्ही | ४ ते ६ टक्के |
| फ्रीज | ४ ते ६ टक्के |
| वॉशिंग मशीन | १० टक्के |
| स्मार्टफोन | मॉडेलनुसार |
| कार | मॉडेलनुसार |
| ब्रँडेड कपडे | ८ टक्के |





























































