
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात तिच्या अभिनय कौशल्यासोबतच स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.तिने नुकताच तिचा एक नवीन आणि स्टायलिश लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा मेकओव्हर पाहून चाहत्यांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या नवीन फोटोंमध्ये वनिताचा अतिशय ग्लॅमरस आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे.

तिने परिधान केलेल्या डिझायनर ड्रेसने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतेले होते.

तिच्या या आऊटफिटवर तिने केलेली साधी पण स्टायलिश हेअरस्टाईल आणि उठून दिसणारा मेकअप तिच्या संपूर्ण लूकला अधिक सुंदर बनवत आहे. तिने गळ्यात एक नाजूक सोन्याची चेन, हातात मॅचिंग सोनेरी बांगड्या व अंगठ्या घातल्या आहेत.

वनिताचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 
तिचा हा नवीन लूक सध्या फॅशन वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने हे फोटो शेअर करुन तिने ‘32 वर्ष अधिक मजबूत, आरोग्यदायी आणि आनंदी आहेत; या वर्षी मी फक्त वजनच कमी केले नाही तर स्वतःला शोधले आहे,’ अशी फोटोओळही फोटोंना दिली आहे.





























































