
डोंगर-दऱ्यांतून फुललेली हिरवाई… वाऱ्याच्या मंद झुळकीने हलकेच हेलकवणारी गवताची लुसलुशीत पोपटी पाती… निळ्याशार आकाशात दाटणारे ढग…. अन् या ढगांआडून अवचितच डोकावणारी सूर्याची किरणे… तर कधी चिंब-चिंब करणाऱ्या अवखळ सरींचा रंगणारा खेळ! तन-मनाला चैतन्याची साद घालणारा पानशेत-वरसगाव धरणपरिसरातील हा निसर्गाविष्कार टिपला आहे चंद्रकांत पालकर यांनी. या निसर्गाविष्काराबरोबरच परिसरात सुरू असलेली भातलावणीची लगबग नजरेतून सुटली तर नवलच!






























































