
दिल्लीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि गोळीबार हा मुद्दा गाजत आहे.

विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून शुक्रवारी सकाळी देखील संसद परिसरामध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अमित शहा संसदेतून गायब का आहेत? असा सवाल असणारे बॅनर यावेळी खासदारांनी झळकावले.

तसेच राम मंदिर देणगी चोरीवरून एक नाटक सादर करत भाजपला डिवचले.
अमित शहा संसदेतून गायब का आहेत? संसद परिसरामध्ये विरोधकांचे आंदोलन, राम मंदिर देणगी चोरीवरूनही भाजपला डिवचले pic.twitter.com/Rum79AHR0V
— Saamana Online (@SaamanaOnline) July 31, 2026
विरोधकांच्या आंदोलनावेळी पुजाऱ्याच्या वेशात आलेले अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यासमोर दानपेटी ठेवण्यात आली होती. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यासमोरील दानपेटीमध्ये पैसे टाकले. एवढेच नाही तर इतर खासदारांनीही त्यांचे अनुकरण केले. त्यानंतर पप्पू यादव हे दान दिलेले पैसे घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधी खासदार त्यांना पकडतात असे नाटक करण्यात आले. यावेळी चंदा चोर, गद्दी छोड… असा घोषणाही देण्यात आल्या.
‘चढ़ावा चोर – गद्दी छोड़’
राम मंदिर में BJP-RSS ने ‘चढ़ावा चोरी’ कर देश के करोड़ों रामभक्तों की श्रद्धा से खिलवाड़ किया है- ये महापाप है।
आज संसद परिसर में विपक्ष के सांसदों ने बेहद अनोखे तरीके से ‘चढ़ावा चोरी’ के खिलाफ विरोध प्रदर्शन किया।
📍 दिल्ली pic.twitter.com/jrCkvYwAGT
— Congress (@INCIndia) July 31, 2026



























































