Jammu Kashmir – मुसळधार पावसामुळे बाल्टाल मार्ग बंद, अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे बाल्टाल मार्गावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेकरुंची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाल्टाल मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्काळ स्थगित करण्यात आली आहे. जोपर्यंत हवामान सामान्य होत नाही आणि मार्ग सुरक्षित होत नाही तोपर्यंत यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरनाथ यात्रेसाठी वापरला जाणारा पहलगाम मार्ग जवळपास दोन आठवड्यांपासून बंद आहे. आता बाल्टाल मार्गही बंद झाल्याने यात्रेत पूर्णपणे व्यत्यय आला आहे. प्रशासनाने सर्व यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.