११ निरीक्षकांना एसीपीपदी बढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ११ पोलीस निरीक्षकांना आज सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदी बढती देण्यात आली. एसीपी बढतीचा आदेश आज गृह विभागाकडून जारी करण्यात आला.

एसीपीपदी बढती मिळालेले अधिकारी
बाळासाहेब पवार- जालना, स्नेहा गिरी- पुणे ग्रामीण, स्वाती गायकवाड – अकोला लोहमार्ग, निर्मला परदेशी धाराशीव, सुनील रोहोकले – नाशिक ग्रामीण, विमल बिडवे- लोहमार्ग, आनंद मुदलीयार- मुंबई शहर, अनंत साळुंखे- अॅण्टी करप्शन ब्युरो, सूर्यकांत कोकणे- छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, तयुब मुजावर-अमरावती (जात प्रमाणपत्र पडताळणी), अनिल तनपुरे- पुणे शहर.

दरम्यान, मुंबई शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यांत बदल्या झाल्या आहेत. बदलीचा आदेश जारी होऊन महिना उलटून गेला, पण अजूनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास कार्यमुक्त न केल्याने कार्यवाही कधी होणार असा सवाल वेटिंगवरील अधिकारी उपस्थित करत आहेत.