
महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही अतिशय सामान्य समस्या आहे. विशेषतः वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे हाडांची झीज वेगाने होऊ लागते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया आणि हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.
कॅल्शियम हे केवळ हाडांसाठीच नव्हे तर स्नायूंचे कार्य, मज्जासंस्थेचे आरोग्य आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठीही आवश्यक आहे. प्रौढ व्यक्तींना दररोज साधारण 1,000 ते 1,200 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. रजोनिवृत्तीनंतर अनेक महिलांना यापेक्षा अधिक कॅल्शियमची आवश्यकता भासू शकते.
महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळेच अवघ्या चाळीशीच्या जवळपास पोहोचताना हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पद्धतीने कॅल्शियमचा समावेश असणे गरजेचे आहे. आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात.
कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
सोयाबीनपासून तयार झालेल्या टोफूमध्येही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे टोफूचा आहारात आठवड्यातून एकदा तरी समावेश करावा. कॅल्शियम वाढीसाठी सोया दूध हाही एक उत्तम पर्याय आहे.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
गुळ चणे हा कॅल्शियमचा एक भन्नाट पर्याय आहे. रोज एक गुळाचा खडा आणि थोडे चणे खाल्ल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.
दूध, चीज आणि दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणूनच दिवसातून एकदा तरी या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
रोज सकाळी बदाम खाणे किंवा बदाम दूध पिणे हा एक उत्तम कॅल्शियमचा स्त्रोत मानला जातो.























































