दीपांशू पुन्हा डोपिंगच्या जाळ्यात; बंदीची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच हिंदुस्थानी कुस्तीला मोठा धक्का बसला आहे. ग्रीको-रोमन प्रकारातील 130 किलो वजनी गटासाठी हिंदुस्थानी संघात निवड झालेला मल्ल दीपांशू पुन्हा एकदा डोपिंगच्या जाळ्यात अडकला आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) त्याच्यावर तात्पुरती बंदी घालत हिंदुस्थानी संघातून त्याची हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे दीपांशू दुसऱ्यांदा डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. यापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान त्याच्या नमुन्यात प्रतिबंधित स्टिरॉइड आढळले होते. त्यावेळी त्याने दोष मान्य केल्यानंतर त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2025 मध्ये ही बंदी संपल्यानंतर त्याने पुनरागमन करत राष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळवले होते.