
आंदोलक विद्यार्थ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यास सरकार तयार आहे. आम्ही याआधीच संवादाचे एक माध्यम तयार केलेले आहे. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, अशी माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी दिली. सरकार आता विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि सल्ला केवळ रांचीच्या जयपाल सिंह स्टेडियमपर्यंत मर्यादित ठेवू इच्छित नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
सरकार सर्व जिह्यांतील विद्यार्थ्यांच्या मागण्या, सल्ले एकत्र करणार आहे. सरकार लवकरच झारखंड आणि देशातील विद्यार्थी, शिक्षकांचे सल्ले एकत्र केले जातील. या सल्ल्यांच्या आधारावर आवश्यक सुधारणा करून योग्य पावले उचलली जातील, असे सोरेन म्हणाले.
नेहा बोरावर शाईफेक
झारखंड विधानसभेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चादरम्यान विद्यार्थी नेत्या नेहा बोरा हिच्यावर शाई फेकण्यात आली. हे काम भाजप आणि आरएसएसच्या सांगण्यावरून केल्याचा दावा नेहा बोरा हिने केला. शाई फेकणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.





























































