अस्मिता अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अस्मिता चलिहाने कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अस्मिताने दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने हिंदुस्थानच्या रक्षिता रामराजचा 21-13, 16-21, 21-13 असा पराभव केला.

पहिल्या गेमपासून अस्मिताने आक्रमक खेळाचा धडाका लावत 21-13 अशी बाजी मारली. मात्र, रक्षिताने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पलटवार करत 21-16 असा गेम जिंकला आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये मात्र अस्मिताने रक्षितेला संधीच दिली नाही. अनुभव, आक्रमकता आणि अचूक फटक्यांचा सुरेख मेळ साधत तिने तिसरा गेम 21-13 असा जिंकला आणि अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.