महिला संतांची अभिव्यक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव या सर्वांचे अभंग आपण वाचत आहोतच. पण बरीच वर्षे महिला संतांच्या साहित्याची दखल आपल्याकडे घेतली जात नव्हती. सातशे वर्षांपूर्वी महिला संतांनी रचलेले अभंग आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, हे विशेष आहे. महिला जवळपास वर्षभर काम करतच असतात. त्यामुळे महिलांना वारीचा एक महिना विश्रांतीचा मिळतो. वारीत पुरुष स्वयंपाकाची कामे करतात, मोकळे संवाद होतात. विठ्ठल हे महिला संतांचं व्यक्त होण्याचं माध्यम होतं. सर्व संत जसं म्हणतात, त्याप्रमाणे महिला संतसुद्धा त्यांची भावना व्यक्त करतात- ‘विठ्ठल माझा देव। विठ्ठल माझा भाव। विठ्ठल माझा गुरू। विठ्ठल माझा तरू।।’ संत मुक्ताबाई (ज्ञानदेवांची धाकटी बहीण, निवृत्तिनाथ तिचे गुरू होते) सर्व महिला संत गुरूंना अपार महत्त्व देतात. मुक्ताबाई म्हणतात, – ‘मी सद्गुरूची लेक, भाव एक । बाई मी निसंग धांगडी, फेकिली प्रपंच लुगडी। सोयराबाईंचा एक अभंग स्त्रियांच्या मासिक पाळी धर्माविषयी सुद्धा बोलतो. आजही हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. महिन्याच्या या काळात स्त्रियांवर अनेक बंधने येतात. त्यावर त्या बोलतात – ‘देहासी विटाळ म्हणती सकळ। आत्मा तो निर्मळ शुध्दबुद्ध। देहिंचा विटाळ देहिंच जन्मला। सोवळा तो झाला कवण धर्म।।