आरएसएसचे विचार विद्यार्थ्यांवर लादताय! बारा शाळांना बॉम्बने उडविण्याचा ई-मेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तानी संघटनेकडून आज सकाळी शहरातील बारा शाळांना बॉम्बने उडविण्याची ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. ‘आरएसएसचे विचार विद्यार्थ्यांवर लादताय’ असा आरोप या मेलद्वारे करण्यात आला आहे. या ‘मेलबॉम्ब’नंतर  पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने सर्व शाळांची कसून तपासणी केली असून कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

शहरातील नामांकित 12 शाळांना सकाळी 10 च्या सुमारास हा ई-मेल पाठविण्यात आला. त्यात शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून त्याचा स्फोट होईल, अशी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.

बॉम्बची धमकी मिळालेल्या शाळांमध्ये सेंटर पॉइंटच्या भांडेवाडी, सदर शाळेसह केंद्रीय विद्यालयाच्या अजनी, काटोल, वायुसेना नगर येथील शाळांचा समावेश आहे. सोबतच जिल्हा न्यायालयाचाही समावेश आहे.