
राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जानेवारी 2026 पासून लागू होईल. वित्त विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला. 5 लाखांहून अधिक कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱयांना याचा लाभ मिळेल.
























































