
महायुतीच्या राजवटीत महाराष्ट्राची अधोगती सुरूच आहे. सरकारच्या बेफिकीर कारभारामुळे अनेक उद्योग बाहेर जात असताना आता रोजगाराच्या बाबतीतही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगार देणाऱया राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस (ETS) या संस्थेने भारतीय उद्योग महासंघ (CII), भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला आहे. यात सात प्रमुख उद्योगांमधील 1 लाखांहून अधिक उमेदवार आणि 1000 हून अधिक संस्थांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
टॉप टेन रोजगारक्षम राज्ये
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- केरळ
- पंजाब
- मध्य प्रदेश
- पश्चिम बंगाल
- राजस्थान
- अरुणाचल प्रदेश
- जम्मू-कश्मीर.
2025 मध्ये देशातील रोजगार क्षमतेचा दर 54.81 टक्के होता, तो 2026 मध्ये 56.35 वर गेला आहे.
नोकरी मिळवून देण्याच्या बाबतीत तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, उत्पादन, नूतनीकृत ऊर्जा, आरोग्य सेवेसह एआय क्षेत्र आघाडीवर आहे.
























































