
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता फोर्ट येथील मुंबई पोलीस क्लबच्या प्रेरणा सभागृहात पार पडणार आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळाचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पप्पू-प्राची प्रकाशनाच्या वतीने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.




























































