
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी सरकारला केले.
तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या विनाशकारी पुरामुळे गावेच्या गावे वाहून गेली आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सुमारे ४०० लोकांमध्ये किमान १०५ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा (NRIs) समावेश आहे.
‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये, खर्गे यांनी नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे (flash floods) झालेली जीवितहानी आणि विनाश पाहून धक्का खेद व्यक्त केला. तसेच, नेपाळला शक्य ती सर्व मानवीय मदत पुरवण्याचे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे मला तीव्र धक्का बसला असून दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या काळात आम्ही नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
Deeply shocked and saddened by the devastating flash floods in Nepal. My heartfelt condolences to those who have lost their loved ones. We stand in solidarity with the people of Nepal in this hour of grief.
We are deeply concerned about reports of over 100 Indians who remain…
— Mallikarjun Kharge (@kharge) August 26, 2026
१०० हून अधिक भारतीय बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे आम्हाला तीव्र चिंता वाटत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन खरगे आपल्या पोस्टमध्ये केले आहे.





























































