Ratnagiri News – अंगारकी संकष्टीला गणपतीपुळ्यात भाविकांची अलोट गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगारकी संकष्टी निमित्ताने मंगळवारी गणपतीपुळे मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात जत्रा भरली होती. अंगारकी संकष्टी असल्याने गणपतीपुळे मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले करण्यात आले. सर्वप्रथम मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पुजाअर्चा, मंत्रपुष्प आणि आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना रांगेतून दर्शनासाठी सोडण्यात आले.

सायंकाळी श्रींची पालखी वाजत-गाजत बाहेर काढली. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भविकांनी गणपती बाप्पा… मंगलमूर्ती मोक्याच्या जयघोषात गणपती बाप्पाचा जयजयकार केला. श्री देव गणपतीपुळे देवस्थानने भविकांसाठी नीटनेटके नियोजन केले होते. पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता.