
दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय-दुबईच्या विमानात बुधवारी हवेत हजारो फुटांवर अघटित घडले. कॉकपिटमधील दोन वैमानिकांमध्ये झटापट झाली आणि यात हिंदुस्थानी वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार हे जखमी झाले. विशेष म्हणजे रक्तबंबाळ झालेला असतानाही या कॅप्टन स्मित मच्छार यांनी धाडस दाखवत 27 लहान मुलांसह 174 प्रवाशांचे प्राण वाचवले. याचे जगभरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे मनापासून कौतुक केले आहे.
नेमके काय घडले?
फ्लायदुबईचे उड्डाण एफझेड 1073 हे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलच्या बेन ग्युरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. विमान इस्रायलच्या हवाई हद्दीजवळ पोहोचले असताना कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये अचानक वाद झाला. या घटनेदरम्यान कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. दोन्ही वैमानिक भिडल्याने नियंत्रण सुटलेले विमान काही वेळात सुमारे 14 हजार फुटांनी खाली घसरले आहे. कॉकपिटमधील थरार पाहून केबिन क्रू आणि एका प्रवाशाने तातडीने आत प्रवेश करत नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या घटनेनंतर विमानाने आपत्कालीन संदेश पाठवत मार्ग बदलला आणि तबूक येथे सुरक्षित लँडिंग केले. सौदी अरेबियातील विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमानावरील सर्व 174 प्रवासी सुरक्षित असल्याचे समोर आले असून सह-वैमानिकाला सौदी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. इस्रायल, हिंदुस्थान, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेचे नागरिक या विमानात प्रवास करत होते.
VIDEO | Visuals from Indian pilot Captain Smit Machchhar’s residence in Mumbai.
Captain Smit Machchhar, piloting a Flydubai flight from Dubai to Tel Aviv, reportedly fought off his co-pilot who allegedly attempted to crash the aircraft. The flight made an emergency landing in… pic.twitter.com/pH97iLYjKQ
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2026
कोण आहेत स्मित मच्छार?
- सुमित मच्छार हे मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील रहिवासी आहेत. ते जून 2022 पासून फ्लाय-दुबईच्या बोईंग 737 विमानांच्या ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्यांना बोईंग 737-800 तसेच 737 मॅक्स 8 आणि 9 या विमानांवर सुमारे 9750 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी न्यूझीलंडमध्ये 18 महिने पायलटचे ट्रेनिंगही घेतले आहे.
- फ्लाय-दुबईमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील स्पाइसजेटमध्ये तब्बल 11 वर्षे काम केले. तेथे त्यांनी वरिष्ठ कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. नोव्हेंबर 2020 मध्ये ते लाइन ट्रेनिंग कॅप्टन झाले. या भूमिकेत त्यांनी इतर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांचे मूल्यमापनही केले. स्पाइसजेटमधील त्यांच्या कारकिर्दीत 6400 तासांहून अधिक पायलट-इन-कमांड अनुभव असल्याचे त्यांच्या प्रोफाइलमध्ये नमूद आहे.
- मच्छार यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. त्यांचा भाऊही अकासा एअरमध्ये वैमानिक असल्याचे वृत्त आहे. सध्या मच्छार यांच्यावर सौदी अरेबियातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोदी, ट्रम्प, नेतन्याहूंकडून कौतुक
दरम्यान, 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मच्छार यांना सलाम ठोकला आहे. मच्छार हे खरे हिरो असल्याचे मोदींसह नेतन्याहू यांनी म्हटले. तसेच मोदींनी मच्छार यांच्या पालकांशी आणि पत्नीशी फोनवरून संवादही साधला.
Captain Smit Machchhar is a HERO.
In the face of the gravest danger and despite being seriously injured, he showed immense courage and an unwavering resolve to protect the lives of others.
His valour helped save hundreds of lives and avert a great tragedy.
India is proud of…
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2026

























































