उद्धव ठाकरे यांनी केले प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, ठाण्यातील निवासस्थानी घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पूर्णेकर यांच्या ठाण्यातील मानपाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणनं ऐकून घेतलं.

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (47) यांची मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता गोळय़ा झाडून आणि शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पूर्णेकर रक्ताच्या थारोळय़ात कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

प्रदीप पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणली, शिंदे पतीपत्नीच पूर्णेकर यांच्या हत्येचे मास्टर माइंड आहेत. मारेकरी फक्त मोहरे आहेत. त्यामुळे मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम व बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी केली आहे.