
पोलिसांना पुढे करून डरपोक मोदी सरकारने हुकूमशाहीविरुद्धचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, तो प्रत्यक्षात यशस्वी झाला नाही. हुकूमशहा घाबरतो तेव्हा त्याच्यातला सैतान स्वतःच्या बचावासाठी सशस्त्र पोलादी भिंती उभ्या करतो, पण जनतेच्या बंडापुढे या भिंती उद्ध्वस्त होतात आणि हुकूमशाहाचा अंत होतो. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना खलनायक ‘मोगॅम्बो’ची उपमा दिली आहे. मोगॅम्बोने दहा–बारा वर्षे लोकांचा छळ केला. देशाची फसवणूक केली. देशाची तिजोरी लुटली व मतपेटीदेखील लुटली. या लुटीचा हिशेब मागण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मोगॅम्बो आता काय करणार?
ज्ञानेश कुमार या मस्तवाल मुख्य निवडणूक आयुक्ताच्या विरोधात झालेले आंदोलन फसले, काॅक्रोच पार्टीच्या आंदोलनाचा ‘फ्लॉप शो’ झाला असे भारतीय जनता पक्षाने जाहीर केले. भाजपसंबंधित ‘चमचेगिरी’ वर्तमानपत्रांनी जन आंदोलनाचा अपमान करणारे मथळे देऊन स्वतःचा मूर्खपणा आणि डरपोकपणा सिद्ध केला आहे. प्रत्यक्षात दिल्लीत नेमके उलटे घडले आहे. दिल्लीतील आंदोलन दडपशाही मार्गाने नष्ट करण्याचा झालेला प्रयत्न घृणास्पद असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. रविवारी दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर आंदोलन होत असताना हजारो लोकांना अटक झाली. महिलांना फरफटत प्रिझन व्हॅनमध्ये काेंबले. अज्ञात स्थळी नेऊन बंदिवान केले याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा आदर करावा आणि मनमानी पद्धतीने ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले त्यांची सुटका करावी असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले. संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनाला कोणी विचारत नाही हे खरे, पण भारतातील ही दडपशाही आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरली हे महत्त्वाचे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि लंडनमधील वृत्तपत्रांमध्ये दिल्लीतील दडपशाहीची छायाचित्रे प्रसिद्ध करून भारतातील लोकशाही संकटात असल्याचे निरीक्षण नोंदवले हे पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांसाठी
लज्जास्पद
आहे. 10 तारखेचे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून छत्तीसगड, झारखंड, जम्मू-कश्मीर, मणिपूर येथील जे लाखोंचे सशस्त्र बल दहशतवादी, नक्षलवादी वगैरेंना रोखण्यासाठी तैनात होते, ते दिल्लीत उतरवले गेले. संपूर्ण दिल्लीतील सीमा आणि गल्ल्यांची नाकेबंदी करण्यात आली. कृष्ण मेनन रोडवरील गृहमंत्री अमित शहांच्या घराभोवती लाखभर सशस्त्र दलाचा वेढा पडला आहे. इंटरनेट सेवा बंद केली, मेट्रो पूर्णपणे बंद केली. बसेस, ट्रकची वाहतूक बंद केली. दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाडय़ा वाटेतच थांबवल्या. दिल्लीत येणारी विमाने थांबवली. दीपके, रांका वगैरे काॅक्रोच नेत्यांना पोलिसांनी विमानात घुसून अटक केली. दिल्लीतले आंदोलन रोखण्यासाठी मोदींचे सरकार हुकूमशाहीतल्या सर्व क्लृप्त्या व अवजारे वापरत होती. कारण सरकारची चड्डी ओली झाली होती. सरकार भयाने थरथरले होते. हा सर्व विरोध मोडून विद्यार्थी व समाजातले घटक मोठय़ा संख्येने दिल्लीतील आंदोलनात उतरले. तरीही भाजपचे बिनडोक प्रवत्ते व पुढारी आंदोलन फसले असे म्हणत असतील तर त्यांना मेंदूज्वराचा झटका आला आहे आणि त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे, असेच म्हणावे लागेल. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानाकडे निघालेल्या तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व केले व ज्यांच्यामुळे
भारत मानवतावादी
आणि लोकशाहीवादी गांधीजींचा देश म्हणून जगमान्य ठरला, त्या गांधींच्या ‘पणतू’ला पोलिसांनी सत्याग्रह करण्यापासून रोखले. फडणवीस सरकारला हे शोभले काय? इतकी भीती कसली? अहिंसक मार्गाने सत्याग्रह करणाऱ्यांना रोखले जाते तेव्हा सरकारच्या शरीरातला हुकूमशहा घाबरला आहे हे मान्य केले पाहिजे. तुषार गांधींच्या सुटकेसाठी दादाभाई नौरोजी पोलीस ठाण्यात जाऊन आदित्य ठाकरे व शिवसैनिकांनी आंदोलन केले. हे स्वातंत्र्य लढय़ातील वणवा पेटत असल्याचे लक्षण आहे. देशाच्या राजधानीतील ठोकशाहीने भारताच्या प्रतिमेचे तुकडे झाले आहेत. पोलिसांना पुढे करून डरपोक मोदी सरकारने हुकूमशाहीविरुद्धचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, तो प्रत्यक्षात यशस्वी झाला नाही. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या चार माजी मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी अटक केली. त्यात ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. हुकूमशहा घाबरतो तेव्हा त्याच्यातला सैतान स्वतःच्या बचावासाठी सशस्त्र पोलादी भिंती उभ्या करतो, पण जनतेच्या बंडापुढे या भिंती उद्ध्वस्त होतात आणि हुकूमशाहाचा अंत होतो. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना खलनायक ‘मोगॅम्बो’ची उपमा दिली आहे. मोगॅम्बोने दहा-बारा वर्षे लोकांचा छळ केला. देशाची फसवणूक केली. देशाची तिजोरी लुटली व मतपेटीदेखील लुटली. या लुटीचा हिशेब मागण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मोगॅम्बो आता काय करणार?





























































