Ratnagiri News – एंडोस्कोपीद्वारे 19 वर्षीय मुलीच्या पोटातून टोचणारी पिन यशस्वीरित्या काढली  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महाड तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीच्या पोटात अडकलेली टाचणीसारखी टोकदार पिन एंडोस्कोपीच्या माध्यमातून यशस्वीरित्या काढण्यात आली. ही उपचार प्रक्रिया बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण, सावर्डे येथे डॉ. आनंद जोशी (ग्रॅस्ट्रोलॉजिस्ट) यांनी केली.
महाड येथील एका खेडेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने खेळता खेळता एक टोकदार पिन तोंडात धरली होती. त्याचवेळी अचानकपणे ती पिन तिच्या घशात गेली. मुली ने घाबरत घाबरत ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली. आई वडीलांनी तिला त्वरीत शासकीय रुग्णाल्यात दाखल केले. तेथे एक्स-रे केल्यावर ती पिन मुलीच्या जठरामध्ये आढळली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुंबई किंवा पुणे येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी सांगितले. परंतु हा खर्च न परवडण्याजोगा असल्याकारणाने तिच्या वडीलांनी बी. के. एल. वालावलकर रुग्णालय गाठले.
तेथे प्रसिद्ध ग्रॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी यांनी एंडेस्कोपीद्वारे पिन काढण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आलेल्या प्रक्रियेत कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या सहाय्याने पिन बाहेर काढण्यात आली. हे उपचार अत्यंत अल्प दरात उपलब्ध झाले. पोटातील किंवा अन्ननलिकेतील धारदार वस्तु वेळेत काढणे महत्वाचे असते, कारण अशा वस्तुमुळे आतील अवयवांना इजा किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका असु शकतो. त्यामुळे या प्रकरणात वेळेत करण्यात आलेली वेद्यकीय तपासणी व उपचार महत्त्वाचे ठरते. डॉ. आनंद जोशी (गॅस्ट्रोलॉजिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली एंडोस्कोपीद्वारे पिन यशस्वीरित्या काढण्यात आल्याने रुग्णाची मोठी शस्त्रक्रिया टाळता आली.