उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी

भंडारा जिल्ह्यातील उसर्रा गावाजवळच भीषण अपघात झाला आहे. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला ट्रकमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

रामटेक गोंदिया महामार्गावरील उसर्रा गावाजवळील पुलावर कोळशाचा ट्रक उभा होता. रामटेककडून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला असुन ट्रकच्या केबिन मध्येच अडकून पडला आहे. याची माहिती गावकऱ्यांना होताच अपघाताच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पण चालक केबिन मध्ये अडकून पडल्याने ट्रकच्या केबिनचा भाग कापून ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.