शेतकऱ्यांचा आसुड आता शांत बसणार नाही! – आदित्य ठाकरे

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याने दबून गेला आहे. पीकविमा, केवायसीच्या नावाने नुसता गोंधळ सुरू आहे. मदतीच्या नावाखाली छदामही शेतकऱयांच्या पदरी पडलेला नाही. शेतकरी टाहो पह्डतोय पण त्याचे अश्रू पुसण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. आता शेतकऱयाच्या आसूड शांत बसणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ातील निपाणी, लोहगाव, गुरुधानोरा, मुद्देश वडगाव येथे आदित्य ठाकरे यांनी बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अॅड. अशोक पटवर्धन, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड आदी होते.

पावसाअभावी खुरटलेला कापूस, मका, कापूस, सोयाबीन पाहून आदित्य ठाकरे हेलावून गेले. दुष्काळाने खचू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. नाठाळ सरकारला मदत देण्यासाठी भाग पाडू असा दिलासा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.   उद्या होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी हिताचा कोणता निर्णय होईल असे वाटत नाही. कारण हे सरकार केवळ राजकारण करण्यात मग्न आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तिघाडा सरकारमधील मंत्री केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते आहेत की राज्याचे मंत्री असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले.

कृषी साहित्यावरील जीएसटी रद्द करा

निपाणी येथे स्थानिक शेतकऱयांनी कृषी साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याचे सांगितले. पेंद्रातील सरकार केवळ उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱयांना या सरकारने वाऱयावर सोडल्याचा आरोप शेतकऱयांनी यावेळी केला. कृषी साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे खते, कीटकनाशके, बियाणे खरेदी करताना शेतकऱयांची पंबर मोडते. हा जीएसटी रद्द झाल्यास मोठा आधार होईल असे शेतकरी म्हणाले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱयांशी संबंधित अनेक कायदे, नियमात बदल करण्याची गरज बोलून दाखवली.