कोव्हिड-19 लसीचे होतात साईड इफेक्ट, अॅस्ट्राझेनेका कंपनीची कबुली

कोरोनावर तयार पेलेल्या कोव्हिड-19 लसीचे काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये काही व्यक्तींमध्ये टीटीएससारखे साईड इफेक्ट दिसू शकतात, अशी कबुली ही लस बनवणा-या ब्रिटनमधील अॅस्ट्राझेनेका या औषध निर्मिती कंपनीने आज न्यायालयात दिली. या संदर्भात कंपनीने फेब्रुवारी महिन्यात न्यायालयात कागदपत्रे सादर केली होती. ब्रिटनमध्ये सध्या या कंपनीविरोधात खटला सुरू आहे.

जगभरात कोरोना साथीची लाट आली असताना अॅस्ट्राझेनेका कंपनीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर संयुक्तपणे कोव्हिड-19 या कोरोनावरील लसीची निर्मिती केली. मात्र, काही व्यक्तींना ही लस दिल्यामुळे त्यांच्यात थ्रोंबोयसिस विथ थ्रोंबोसायटोपेनिया (टीटीसी) यासारखे साईड इफेक्ट दिसू लागले. या साईड इफेक्टमुळे शरीरात रक्त जमा झाले, काहींना ब्रेनस्टोक किंवा हृदयाशी संबंधित धोका वाढला तर काही रुग्णांचा मृत्यू झाला तर काही जणांना गंभीर शारीरिक व्याधी निर्माण झाल्या, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, अॅस्ट्राझेनेका कंपनीने हीच लस पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटबरोबर संयुक्तपणे कोव्हिशिल्ड नावाने हिंदुस्थानात बनवली होती.