भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, खडसे कुटुंबीयांचे तपासात असहकार्य; राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोसरी जमीन घोटाळय़ाप्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यांच्या तपासात खडसे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने खडसेंच्या वकिलांना विचारणा करत या प्रकरणातील कारवाईला दिलेली स्थगिती हटवून याचिका गुणवत्तेच्या आधारे सुनावणीस घेऊ अशी तंबी दिली.

भोसरी येथील जमीन विक्रीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात ईडीने खडसे त्यांच्या व कुटुंबीयांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला दिलेली अंतरिम स्थगिती तूर्तास कायम ठेवत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.