
कपडे खरेदीच्या नावाखाली नागपूरच्या व्यापाऱ्याचे 12 लाख रुपये घेऊन गेलेल्या एकाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद नफीस अब्दुल खान हे नागपूरचे रहिवासी आहेत. कपडय़ाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी मित्रांकडून कपडे खरेदीसाठी 12 लाख रुपये घेतले होते. दिल्लीत त्याची एकाशी ओळख झाली. त्याने त्याला होलसेलमध्ये कपडे देण्याचे आश्वासन देऊन मुंबईत बोलावले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार मुंबईत आले. बीकेसी येथे त्यांना बोलावून त्याच्याकडील 12 लाख रुपये असलेली कॅश बॅग घेतली. आणि कपडे घेऊन येतो असे सांगून एक जण निघून गेला. काही वेळानंतर पोलिसांचा छापा पडल्याचे भासवून त्याच्या साथीदारांनी पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला अटक केली.




























































