बर्गर

32

बर्गर… अस्सल विदेशी खाद्यप्रकार… पण आपल्याकडे तो प्रचंड लोकप्रिय…

बर्गर… फास्ट फुड रेस्टॉरंट, डिनर आणि स्पेशालिटी मोठमोठय़ा उपहारगृहात बर्गर विकले जातात. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रिय आणि प्रादेशिक भिन्नता आढळते. टर्की बर्गर, बाइसन बर्गर, हॅमबर्गर किंवा व्हेजी बर्गर असे बर्गरचे विविध प्रकार यूकेमध्ये प्रचलित आहेत.  युकेमध्ये मांसाहारी बर्गर विशेषत्वाने खाल्ले जातात.

बर्गरमध्येही सॅण्डविचप्रमाणे  दोन पावांच्या मध्ये तळलेले व्हेज किंवा मिट पॅटी असते. हॅमबर्गर चीझ आणि कोशिंबीरीसाठी वापरण्यात येणारा पाला उदा. कोबीची पाने , टोमॅटो, खारवून वाळवलेले ड़ुकराचे मांस, कांदा, लोणचे किंवा मिरची, अंडय़ातील बलक, केचअप यांच टॉपिंग हॅमबर्गरसाठी केलं जातं. हॅमबर्गरमध्ये चीझचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने त्याला चीझ बर्गरही म्हटले जाऊ लागले.

१८९६ साली अमेरिकेत जाणाऱया अनेक प्रवाशांच्या बर्गर खाण्यात आले. ‘द आर्ट ऑफ कुकरी मेड प्लेन अँण्ड इझी’ या पुस्तकात भाजलेल्या ब्रेडपासून तयार केलेल्या बर्गरची रेसिपी देण्यात आली आहे. तेव्हा ते ‘ब्रेड रोल वार्म’ या नावानेही प्रसिद्ध होते. १९०४ साली सेंट लुईस वर्ल्ड फेअरमध्ये टेक्सन या व्यक्तिने पहिल्यांदा बर्गर विकले असे म्हटले जाते.

परदेशी बर्गर हिंदुस्थानात बटाटय़ाची टिक्की भरूनही तयार केले जातात. त्यामुळे शाकाहारी लोकं आवडीने बर्गर खाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे घरगुती मसाले वापरून घरीही चविष्ट बर्गर बनवता येऊ शकतात.

पौष्टिकता

एका बर्गरमध्ये २७१ कॅलरीज, २५.७५ ग्रॅम प्रथिने, १७.८ मेदाचं प्रमाण आणि ९१ टक्के कोलेस्ट्रॉल असते. याशिवाय कोणतीही कर्बोदके फायबर किंवा साखरेचे प्रमाण ४.२ असते.  बर्गरमध्ये ओमेगा ३, ओमेगा ६ असते. कोलिन असते जे मज्जासंस्थेच्या पोषणासाठी आवश्यक असते. तसेच कॅल्शियम, जीवनसत्त्व बी १२, सोडीयम, बी ६, जीवनसत्त्व इ, ड आणि क याचाही समावेश असतो.

आपली प्रतिक्रिया द्या