एसआयआर रद्द करा! ज्ञानूला अटक करा! बंगळुरूतील फ्रीडम पार्कवर घुमला नारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एक ज्ञानेश कुमार गेले तर त्यांच्या जागी दुसरे अज्ञानेश कुमार येऊन बसतील. त्यामुळे फक्त त्यांचा राजीनामा पुरेसा नाही. संपूर्ण एसआयआर रद्द करा आणि ज्ञानेश कुमारांना अटक करा,’ अशी एकमुखी मागणी बंगळुरूतील फ्रीडम पार्कवर जमलेल्या हजारोंच्या गर्दीने आज केली.

देशाचे घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व महिला अत्याचाराच्या विरोधात बंगळुरूतील सिव्हिल सोसायटी आणि कॉक्रोच पार्टीने चप्पल आंदोलन केले. ‘एसआयआर बंद करा…’, ‘व्होट चोर, गद्दी छोड…’, ‘वन टू थ्री फोर, नरेंद्र मोदी व्होट चोर…’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. इथे ‘लोक अदालत’ही घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रकाश राज, अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार आणि सरकारवर तुफान हल्ला चढवला.

मोदींनी लोकशाहीचा खून केला ः दीपके

‘मोदी हे मते चोरून पंतप्रधान झाले आहेत. हजारो मतदारांना मृत दाखवून त्यांची मते मतदार यादीतून वगळली. ते मृत मतदार आजच्या आंदोलनात उपस्थित आहेत. निवडणूक आयोग आणि सरकारने ज्यांना मारले ते मतदार नव्हते, देशाच्या लोकशाहीचा तो मृत्यू होता. ‘भाजपच्या विचारधारेला आणि मोदींना जे विरोध करतात त्यांचा मतदानाचा हक्क हिसकावण्यासाठीच एसआयआर राबवला जात आहे, असा आरोप दीपके यांनी केला.

मतदार यादीतून नाव वगळणे हा नागरिकांच्या हक्कावर व सन्मानावर हल्ला आहे. त्यामुळे एसआयआर रद्दच झाला पाहिजे. हे कोण आहेत आमचा हक्क हिसकावणारे. हा सगळा गंभीर प्रकार आहे.

प्रकाश राज, अभिनेते

मी इथे सरकार बदलण्यासाठी आलो नाही. मला एलॉन मस्क किंवा जॉर्ज सोरोसने पैसे दिले नाहीत. मतदानाच्या अधिकाराविषयी जागरूक असलेल्या प्रत्येकाने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.

ध्रुव राठी, यूटय़ुबर