ईडीचा खटला रद्द करा! भुजबळ कुटुंबीयांच्या अर्जांवर निर्णय 13 ऑक्टोबरला

महाराष्ट्र सदन बांधकामाशी संबंधित 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने दाखल केलेला खटला रद्द करा, अशी मागणी करणाऱया भुजबळ कुटुंबीयांच्या अर्जांवर विशेष पीएमएलए न्यायालय 13 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. राज्याचे पॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ व इतरांच्या अर्जांचा फैसला विशेष न्यायालय करणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सखोल तपासाचे निर्देश दिले होते. त्या तपासाच्या आधारे तीन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले होते.