हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीचे छापे

फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयांवर छापे मारले. हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह चार ते पाच ठिकाणी ही छापेमारी झाल्याने खळबळ उडाली आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लघंन झाल्यामुळे ईडीने हिरानंदानी कंपनीच्या पवई, नरिमन पॉईंट, मलबार हिल, मुलुंड येथील कार्यालयांवर आज छापेमारी केली. परंतु हिरानंदानी कंपनीकडून फेमाचे उल्लघंन कधी व कसे प्रकारे झाले ते मात्र ईडीच्या अधिकाऱयांकडून समजू शकले नाही.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीदेखील आयकर विभागाने हिरानंदानी कंपनीशी संबंधित बऱयाच ठिकाणी छापेमारी केली होती. आता ईडीने कंपनीच्या कार्यालयांवर छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.