FIFA World Cup 2026 फुटबॉलच्या उद्घाटन सोहळ्यात शकिराचा जलवा; उद्घाटन सोहळा कुठे पाहायला मिळेल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fifa-world-cup-2026-opening-ceremony-shakira-live-performance-time-where-to-watch-in-india

फिफा फुटबॉल विश्वचषकाचे यावेळी तीन उद्घाटन सोहळे होणार आहेत. यामधील पहिला सोहळा हा मेक्सिकोमध्ये होणार आहे. या सोहळ्यात नृत्यांगना शकिराचा जलवा पाहायला मिळणार आहे. हा सोहळा 11 जूनला रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर 12 जूनच्या मध्य रात्री 12.30 वाजता मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

मेक्सिकोतील हा सोहळा ऐतिहासिक इस्टाडिओ

अॅझतेका स्टेडियमवर होईल. या सोहळ्यात शकिरा ही ‘डाई… डाई…’ या स्पर्धेच्या थीम साँगवर आपले नृत्य सादर करणार आहे. यावेळी शकिराला बुर्ना बॉयची साथ मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा गायिका टायला आणि कोलंबियन गायक जे. बालविनही यावेळी आपली कला सादर करणार आहेत. यजमान मेक्सिकोचे गायक अलेजांड्रो फर्नांडेझ, लीला डाऊन्स, डॅनी ओशन आणि बेलिंडा विलही गाणी गाणार आहेत. मेक्सिकोचा पॉप बँड माना आणि म्युझिकल ग्रुप लॉस एंजलेस अझुलेस आपली कला सादर करतील.

दुसरा उद्घाटन सोहळा

या वर्ल्ड कपमध्ये दुसरा उद्घाटन सोहळा हा पॅनडामध्ये होणार आहे. हा सोहळा 12 जूनला रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. टॉरेंटो येथील या सोहळ्यात अलानिस मोरिसेटे, अलेसिया कारा, इलाआना, जेसी रेयेझ, मायकल बबल, नोरा फतेही, संजॉय, वेगेड्रीम आणि विल्यम प्रिन्स यांचा समावेश असणार आहे. टॉरेंटो येथे पॅनडाचा पहिला सामना बोस्निया आणि हर्झेगोविनाविरुद्ध खेळवला जाणार आहे.

तिसरा उद्घाटन सोहळा

फुटबॉल वर्ल्ड कपचा तिसरा उद्घाटन सोहळा हा अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमध्ये होणार आहे. हा सोहळा 13 जूनला पहाटे पाच वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्यानंतर अमेरिकेचा संघ पराग्वेबरोबर सलामीची लढत खेळणार आहे.

उद्घाटन सोहळा भारतात कुठे पाहायला मिळेल

फिफा वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा आणि सर्व सामने हे युनिट 8 या चॅनेलवर पाहायला मिळतील. भारतामध्ये झी 5 या वाहिनीवर फुटबॉलचे सामने पाहायला मिळतील.