इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही हार्दिक खेळणार नाही! टिम इंडियाला मोठा धक्का

इंग्लंड संघाविरोधात टिम इंडियाचा रविवारी मुकाबला होणार आहे. या सामन्यापूर्वी टिम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो त्याचे षटक पूर्ण करू शकला नाही. त्याचे षटक विराट कोहलीने पूर्ण केले. या घोट्याच्या दुखापतीमुळे तो रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धचा सामना खोळू शकणार नाही. तसेच त्यानंतर 2 नोव्हेंबरला होणाऱ्या श्रीलंकेसोबतच्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळए विश्वचषकातील पुढील दोन सामने तो खेळू शकणार नाही. मात्र, 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात हार्दिक खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नेदरलँडविरोधात होणाऱ्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता आहे. पुण्यात बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहवी लागेल, असे अकादमीकडून सांगण्यात आले. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने यापुढील दोन सामन्यात तो खेळणार नाही. मात्र, मुंबई किंवा कोलकात्यात होणाऱ्या सामन्यात तो संघात खेळू शकेल, असेही अकादमीने म्हटले आहे. तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होणार आहे. आतापर्यंतचे सर्व सामन्यात टिम इंडियाने विजय मिळवल्याचे संघाचे मनोबल उंचावलेले आहे. तसेच संघाला विजयाची लय मिळाली आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यापर्यंत हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास संघाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लगेच त्याला संघात खेळवण्याची घाई करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.