रशियाच्या हल्ल्यात ‘हॅरी पॉटरचा किल्ला’ उद्ध्वस्त

रशिया आणि युव्रेनमधील युद्ध गेल्या जवळपास दीड वर्षांपासून अद्याप सुरू आहे. रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये काळ्या समुद्रात असलेल्या युव्रेनच्या ओडेसा शहरातील अनेक मोठय़ा इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. रशियाने हल्ला केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये जवळपास 20 इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये ‘हॅरी पॉटरचा किल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱया एका शैक्षणिक संस्थेचादेखील समावेश आहे. या हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यात लहान मुले आणि गरोदर महिलांचादेखील समावेश आहे. हॅरी पॉटर चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे या वास्तूची रचना असल्याने याला त्याच नावाने ओळखले जाते. व्हिडीओ आणि पह्टोमध्ये वास्तूचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. रशियाकडून हल्ल्यासाठी घातक मिसाईलचा वापर करण्यात आला आहे. दुसरीकडे, युव्रेननेदेखील रशियाच्या काही ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र रशियन अधिकाऱयांनी हल्ला झाला असल्याचे नाकारले आहे. रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्राकडून प्रयत्न सुरू आहेत.