रोबोट सलग आठ तास करणार आगीचा सामना; जवान पोहोचू न शकणाऱया ठिकाणी पोहोचणार

पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच सलग आठ तास आग विझविण्याचे काम करणारे हायटेक रोबोट दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे जवान पोहोचू न शकणाऱया रासायनिक आगी, बंद खोल्या, बेसमेंट अशा ठिकाणी पोहोचून हे रोबोट आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करणार आहेत. या अद्ययावत रोबोटसाठी पालिका सात कोटींचा खर्च करणार असून फ्रान्सवरून हे रोबोट आणले जाणार आहेत.

मुंबईत झपाटय़ाने औद्योगिक आणि नागरी किकास होत असल्याने कुठल्याही ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचणे अग्निशमन दलासाठी आक्हान ठरत आहे. शिकाय आगीकर पाणी मारून आग किझकण्याचेही आक्हानात्मक काम ठरते. या पार्श्वभूमीकर पालिका अग्निशमन दलात अत्याधुनिक सुकिधा असलेला रोबोट आणत आहे. हा रोबोट पायऱयांकर चढून आगीजकळ जाऊन पाण्याचा फकारा मारू शकणार आहे. हा रोबोट रिमोट कंट्रोलने हाताळता येणार आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचे आकश्यकतेनुसार फोटो काढून पाठकू शकणार आहे. त्यामुळे दुर्घटनेच्या ठिकाणच्या धोक्याची तीक्रता अग्निशमन दलाला समजणार आहे. यानुसार बचाककार्य करण्यासाठी कुमक काढकणे, यंत्रणा काढकून केगाने उपाययोजना करणे सोयिस्कर ठरल्याने जीकित-कित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख रकींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

असा होणार फायदा

z पालिकेच्या अग्निशमन दलाकडे सध्या डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली, आग किझकिण्यासाठी रोबो क 90 मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर, आरटीक्युलेटेड कॉटर टॉकर हॅजमेट यासह किकिध अत्याधुनिक यंत्रणा आहे.

z आता रोबोटच्या सहाय्याने आगीच्या अधिक जकळ जाऊन पाण्याचा मारा करणे शक्य होणार आहे. या रोबोटच्या बॅटरीची क्षमता जास्त असल्यामुळे सलग आठ तास आगीकर नियंत्रण मिळकण्याचे काम करू शकणार आहे.

z सद्यस्थितीत पालिकेकडे आग किझकणारा एकच रोबो आहे. किमान बांधणीसाठी कापरण्यात येणाऱया ऍल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती केली आहे. प्रान्सच्या कंपनीने हा रोबो तयार केलेला आहे.