सचिनचा आला पहिला फोन, रहाणेने केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत असताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे वृत्त कळताच त्याला लगेच फोन केला. रहाणेने भारतासाठी आणखी सामने खेळावेत अशी सचिनची इच्छा होती. या संभाषणाची आठवण सांगताना रहाणे म्हणाला, ‘‘निवृत्तीची घोषणा केल्यावर मला पहिला फोन सचिन पाजींचा आला. ते म्हणाले की, त्यांना वाटतं मी खूप काळ खेळेन. मी त्यांना सांगितले की, मी कोणत्याही पश्चात्तापाशिवाय निवृत्त होत आहे आणि मला माझी कारकीर्द विनाकारण वाढवायची नाही.’’ रहाणेने हेही सांगितले की, इरफान पठाणनेही त्यानंतर त्याला फोन केला होता, तर पुजारा, विराट, रोहित आणि बुमराह यांनी संदेश पाठवले होते.