
पोर्तुगालचा संघ पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आता त्यांनी एक नवा डाव टाकला आहे. आपल्या संघाचा कर्णधार म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू निवडला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेन्रिक्स 4 कसोटी, 16 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळला होता. त्यानंतर त्याने निवृत्ती पत्करली होती. पण आता त्याला पोर्तुगालच्या संघाचे कर्णधारपद मिळाले आहे.
मोईसेसचा जन्म पोर्तुगालच्या मादेरा बेटावर झाला, हे तेच ठिकाण आहे जिथे महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो राहतो. तो लहान असताना त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. गेल्या महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, मात्र तो परदेशी टी-20 लीगमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे.




























































