CWC 2023 इंग्लंडच्या पराभवाचा हिंदुस्थानला फायदा

श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवामुळे इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील उत्साह संपुष्टात आला आहे. पाचपैकी चार सामन्यांतील पराभवांनी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपल्यातच जमा आहे. त्यामुळे लखनौ येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱया लढतीतील रंजकताच निघून गेली आहे. त्यातच हिंदुस्थानसाठी वर्ल्ड कपच सर्वस्व आहे आणि सलग पाच विजय नोंदवत संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. रविवारच्या लढतीत हिंदुस्थानला आजच्या लढतीचा नक्कीच फायदा होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच इंग्लंडच्या संघाने आज वर्ल्ड कपमधला आपला प्राण सोडला. त्यामुळे ते हिंदुस्थानविरुद्ध पेटून उठतील, याची अपेक्षा कमीच आहे. तसेही इंग्लंडने उर्वरित चारही सामने जिंकले तरी ते दहा गुणांसह उपांत्य फेरीत स्थान मिळवतील ही शक्यता धूसर झाली आहे. हिंदुस्थानने पाचपैकी पाच तर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने पाचपैकी चार सामने जिंकून आधीच आपला दावा केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघही जोरदार खेळत असल्यामुळे चौथा संघ म्हणून तोच स्थान मिळवेल. या संघांना चारपैकी दोन सामने जिंकायचे आहेत.

वर्ल्ड कप स्कोअरबोर्ड
चौकार
1183
षटकार
321
अर्धशतक
067
शतक
021
विकेट
373
3 विकेट
038

धावा
12998
चेंडू
13093

सर्वाधिक धावा
क्विंटन डि कॉक
407
सर्वाधिक odH{$Q>
ऍडम झम्पा
13
वर्ल्ड कप गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
हिंदुस्थान 5 5 0 10 +1.353
द. आफ्रिका 5 4 1 8 +2.370
न्यूझीलंड 5 4 1 8 +1.481
ऑस्ट्रेलिया 5 3 2 6 +1.142
श्रीलंका 5 2 3 4 -0.205
पाकिस्तान 5 2 3 4 -0.400
अफगाणिस्तान 5 2 3 4 -0.969
बांगलादेश 5 1 4 2 -1.253
इंग्लंड 5 1 4 2 -1.634
नेदरलॅण्ड्स 5 1 4 2 -1.902
टीप ः सा. ः सामना, वि. ः विजय,
प. ः पराभव, नेररे ः नेट रनरेट
(ही आकडेवारी इंग्लंड-श्रीलंका
सामन्यापर्यंतची आहे.)