बंगळुरूत कारमध्ये सापडले 9 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील बंगळुरू येथे एका कारमध्ये तब्बल 9 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. आयकर विभागाने 500 रुपयांच्या नोटांनी भरलेली सुटकेस जप्त करून तपास सुरू केला आहे. कारमधील दोन तरुणांना या पैशांचा हिशोब देता न आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स सिटी एक्सप्रेस वे टोल प्लाझानंतरच्या सिग्नलजवळ पथकाने एक ह्युंदाई व्रेटा केएल 20 टी 8629 ला थांबवले. गाडीची तपासणी केल्यानंतर कारमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली एक सुटकेस सापडली. यामध्ये तब्बल 9 कोटी रुपये होते. ही कार बंगळुरूहून तामीळनाडूतील होसूरकडे जात होती. कारमधील दोन्ही तरुणांना पैशांचा हिशोब देता आला नाही. दोन्हीपैकी एक तरुण तामीळनाडूच्या तीतकुडी येथील सिंधू ज्वेलर्समध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.