
युवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने युवा सेनेने रत्नागिरीत “आदित्य युवा हेल्पलाईन” सुरू केली आहे. शिवसेना तालुका समन्वयक शेखर घोसाळे आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. युवासेनेचे रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यावेळी उपस्थित होते. ही सेवा रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईनच्या माध्यमातून युवकांना खालील समस्यांसाठी मदत मिळणार आहे यामध्ये नोकरीच्या ठिकाणी असलेल्या समस्या, शालेय, महाविद्यालयीन आणि पायाभूत सुविधांच्या अडचणी, उच्च शिक्षणासाठी पर्याय वाहतूक एसटी बस आणि परिवहन संबंधित इतर समस्या, शासकीय दाखले, प्रमाणपत्रे मिळवण्यात होणारी दिरंगाई आणि प्रशासकीय अडथळे,डोंगराळ भागात इंटरनेट आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या,आपत्ती व्यवस्थापन,विशेषतः चिपळूण मधील पूर परिस्थिती सारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत,आरोग्य सुविधामधील अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
याकरिता रत्नागिरी- संदेश नारगुडे – 7020127980, ओंकार कोरेकर – 7378707909, आशिष चव्हाण – 9175353635 ,चिपळूण- प्रितम वंजारे – 7038840385, पार्थ जागुष्टे – 7447774442,संगमेश्वर-अमर गवाणकर – 9421136707, लांजा: अभिजित राजेशिर्के – 8888259725,राजापूर- संतोष हातणकर – 7620676731, सुभाष नवाळे – 9420843958 याशिवाय जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत यांच्याशी मो. क्रमांक-9112056156 या क्रमांकावर संपर्क साधला असे आवाहन करण्यात आले आहे.





























































