मुंढेंच्या शिस्तीमुळे कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांकडे लेखी तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. कोणत्याही क्षणी कुठेही धाड घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे अशा त्यांच्या सूचना आहेत. परंतु त्यांची ती कडक शिस्त कामचुकार अधिकाऱ्यांना मात्र रुचलेली नाही. 29 अधिकाऱ्यांनी मुंढे यांच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मुंढे यांनी कामाचा बोजा वाढवल्याने कामात अचुकता येत नसल्याचा आरोप त्यांनी त्यात केला आहे.