जंतरमंतर विद्यार्थी आंदोलन पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तरुणीवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवरील आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रुचिका सिंह या 25 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेतूतः अपमान, सार्वजनिक गैरप्रकार आणि बदनामी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या गाझियाबादच्या स्मृती सिंह यांनी या प्रकरणी नोएडाच्या एक्स्प्रेस-वे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. संबंधित तरुणीने पंतप्रधानांबद्दल वापरलेले शब्द हा केवळ घटनात्मक पदाचा अपमान नसून त्यामागे द्वेष पसरवण्याचा व शांतता भंग करण्याचा हेतू आहे. अशा प्रकारची भाषा कदापि खपवून घेतली जाऊ शकत नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

‘कॉक्रोच जनता पार्टी’ने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंतरमंतरवर काही आंदोलकांनी वापरलेल्या भाषेचे सीजेपी समर्थन करत नाही. मात्र, आक्षेपार्ह भाषा हा फौजदारी कारवाईचा आधार ठरू नये, अशी अपेक्षा सीजेपीने व्यक्त केली.

सीजेपीच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले एफआयआर रद्द करण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिली आहे. निदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही गंभीर कायदेशी कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, ज्यांच्यावर आधीपासून गंभीर गुन्हे दाखल आहे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना कारवाईतून वगळण्यात येणार नाही, असे दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे.