लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 18 वर्षे करण्याची शिफारस ‘

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभे राहणाऱया उमेदवाराचे वय 25 वर्षाऐवजी 18 वर्षे करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. कायदा आणि कार्मिकसंबंधी समितीने शुक्रवारी वय कमी करण्याची शिफारस केली आहे. समितीने यासंबंधी एक अहवाल सादर केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, निवडणूक लढवण्यासाठीचे वय कमी केल्यास तरुणांना लोकशाही प्रक्रियेत मोठया संख्येने सहभागी होण्याची संधी मिळेल. सध्याच्या कायद्यानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 वर्षे पूर्ण करणाऱया देशातील कोणत्याही नागरिकांना मतदान करण्याचा हक्क राज्यघटनेने बहाल केलेला आहे.