
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतला आहे. टीईटी परीक्षा रविवार, 21 जून रोजी होणार होती. परंतु त्या दिवशी राष्ट्रीय परीक्षा संस्था मार्फत देशभरात राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आल्याने आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 28 जूनला घेतली जाणार आहे.
परीक्षेचे आयोजन सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी तसेच परीक्षार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता येत्या 28 जूनला घेतली जाईल, असे परिषदेने जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, 16 जून ते 28 जून 2026 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त करून त्याची मुद्रित प्रत काढता येणार आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. अद्ययावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
वेळापत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 – रविवार, 28 जून 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -2 – रविवार, 28 जून दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.




























































