
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत यावे आणि विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय, अत्याचार यावर निवेदन द्यावे. आम्ही 17 दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदेत येण्याऐवजी रात्री 12 वाजता इन्स्टाग्रामवर रिल बनवत आहेत. त्यांना सभागृहात येण्याची एवढी भीती का वाततेय? याचा अर्थ त्यांना कळून चुकले आहे की आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडले आहे, अशी टीका राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते संसद परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकसभेत आणि राज्यसभेत एकच मागणी आहे की, अमित शहा यांनी संसदेमध्ये यावे आणि आपले निवेदन द्यावे. आम्ही 17 दिवसांपासून प्रयत्न करतो की, शहांनी संसदेत येऊन विद्यार्थ्यावर झालेला अन्याय, अत्याचार, मारहाण यावर निवेदन द्यावे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही रात्री 12 वाजता इन्स्टाग्रामवर रिल बनवत आहेत, पण संसदेत येत नाही. याचा अर्थ जनतेने संसदेत जे सदस्य निवडून दिले आहेत, त्याचा तुम्ही अपमान करत आहात.
एकीकडे जनतेचा अपमान करत आहात आणि दुसरीकडे संविधानाप्रमाणे संसदेचे कामकाज चालायला हवे याकडेही कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आमची ही मागणी आहे की, अमित शहांनी स्वत: सभागृहात यावे आणि निवेदन द्यावे. पंतप्रधान मोदींही गृहमंत्र्यांना निवेदन द्यायला सांगावे आणि स्वत:ही द्यावे. तसेच झाल्यास गेल्या 17-18 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फुटेल. मात्र संसद सुरळीत चालावी अशी त्यांची इच्छा नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे द्यायची नाहीत. त्यांना भीती वाटतेय. कशाची भीती वाटतेय? असा सवालही खरगे यांनी केला.
हमारी मांग है कि अमित शाह सदन में आएं।
हम 17 दिन से कोशिश कर रहे हैं कि अमित शाह सदन में आकर बच्चों के ऊपर हुए अन्याय और अत्याचार पर बयान दें।
प्रधानमंत्री मोदी भी सदन में आकर जवाब देने के बदले रात में इंस्टाग्राम पर रील बना रहे हैं।
आखिर ये लोग सदन में आने से क्यों डर रहे… pic.twitter.com/f1iB24y5bY
— Congress (@INCIndia) August 10, 2026
आपण काहीतरी चुकीचे केलेय, असे वाटत असल्यानेच मोदी-शहा संसदेत येत नाहीत. संपूर्ण देशात विद्यार्थी, तरुण त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे ते कुणालाही आपले तोंड दाखवायला तयार नाहीत. पेपरमध्ये रोज जाहिराती येत आहेत, पण संसदेत चेहरा दाखवत नाहीत. राज्यसभा, लोकसभेतही आपला चेहरा दाखवा, असे आवाहन खरगे यांनी केले.
तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नाचे काहीही पडलेले नाही. तरुण, विद्यार्थी यांच्या समस्यांवरही त्यांना तोडगा काढायचा नाही. त्यामुळे एकतर संसदेत येऊ निवेदन द्या नाही तर राजीनामा द्या. संसदेत येऊन तुम्ही बोलायला तयार नसाल तर राजीनामा द्या, अशी मागणीही मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.


























































