बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये मणिमहेश यात्रेवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिमहेशला जाणारे रस्ते मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. अशा परिस्थितीत मणिमहेशची यात्रा जीवघेणी ठरू शकते. याची खबरदारी म्हणून हिमाचल प्रदेशातील चंबा येथे मणिमहेश यात्रेवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. परिक्रमा स्थळ धंछो, गौरीकुंड आणि मणिमहेश येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पाळत सुरू ठेवली आहे. तसेच कोणत्याही यात्रेकरूना धंछोच्या पुढे जाऊ देऊ नये, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. ‘कार्तिक स्वामी मंदिरा’चे दरवाजे 14 एप्रिल रोजी उघडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही काही भक्त आतापासूनच कार्तिक स्वामी मंदिरात पोहोचू लागले आहेत. यादरम्यान काही लोक मणिमहेशकडे जात आहेत.