वडाळा आगार ते चेंबूरदरम्यान मोनोची सेवा आज बंद

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई मोनोरेलची वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानक यादरम्यानची सेवा उद्या, रविवारी सकाळी बंद राहणार आहे. रात्री 8 नंतर एक तासाच्या अंतराने मोनोच्या फेऱया सुरू होणार आहेत. दरम्यान, संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते वडाळा आगार या स्थानकांदरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत. मोनोरेलच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान होणार व्यत्यय टाळण्याच्या दृष्ठकोनातून देखभाल-दुरुस्तीचे काम हे सुट्टीच्या दिवशी हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, 26 मार्चपासून मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे.