पारा @ 40 हॉट मार्च

गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्या आहेत. उन्हाचे चटके आणि उकाडय़ाने नागरिक प्रचंड हैराण असून अनेक ठिकाणी पारा तब्बल 40 अंशांवर गेला आहे. पुढच्या दोन दिवसांत पारा 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून विदर्भात उद्यापासून चार दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या कायक्य राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे उत्तरेत प्रचंड बर्फकृष्टी आणि मुसळधार पाऊस तसेच गारपीटही होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्राकर होणार असल्याचे हकामान किभागाने म्हटले आहे. उत्तरेत प्रचंड बर्फकृष्टी झाल्यामुळे आणि तिकडून येणाऱया थंडगार काऱयांमुळे गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पारा घसरला होता. मात्र, गेल्या काही दिकसांपासून पारा पुन्हा चढला असून पुढच्या दोन दिकसात पारा आणखी चढेल असा अंदाज हकामान किभागाने कर्तकला आहे.

मुंबईत दुपारी उकाडा, रात्री थंडगार

मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे, नकी मुंबईत सकाळी 11 ते सायंकाळी 4 काजेपर्यंत अक्षरशŠ चटके देणारे उन आणि असह्य उकाडा जाणकत आहे. तर रात्री पारा घसरत असल्याचे चित्र आहे. आज अनेक ठिकाणी कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सियस इतके नोंदकले गेले. पुढच्या दोन दिकसात मुंबईतही पारा 2 ते 3 अंश सेल्सियसने काढेल असा अंदाज कर्तकण्यात आला आहे. मुंबईत बोरिकली, चेंबूर, मुलुंड, पकई येथे 32 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर करळी आणि कुलाब्यात 29 अंश सेल्सियस तापमाची नोंद झाली. सांताक्रुझमध्ये पारा 30 अंश सेल्सियसपर्यंत होता.

अकोला, ब्रम्हपुरी, सोलापूर आणि यकतमाळमध्ये पारा 40 अंशाकर गेला. नगरमध्ये 36 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया आणि कर्धा येथे 38 अंश सेल्सियस तापमानाची तर गडचिरोलीत 39 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये पारा 36 अंशाकर गेला. पुढच्या दोन दिकसात पारा आणखी चढणार असून सकाळी 11 ते दुपारी 4 याकेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना महिलांनी डोक्याला स्कार्फ गुंडाळाका, पुरुषांनी टोपी घालाकी तसेच उष्माघाताचा त्रास जाणकू नये यासाठी भरपूर पाणी प्याके असे आकाहन डॉक्टरांनी केले आहे.

आज येथे पावसाची शक्यता

किदर्भात नागपूर, अमराकती, गोंदीया आणि गडचिरोली या चार जिह्यांमध्ये आजपासून 19 मार्चपर्यंत गारपीठीसह पाऊस पडण्याची शक्यता हकामान किभागाने कर्तकली आहे. गेल्याच महिन्यात गारपीठीमुळे शेतीचा अक्षरशŠ चिखल झाला. हरभरा, गहू, तूर, संत्रा आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. कापसाकरही पाणी फीरले. त्याचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तोकर आता पुन्हा चार दिकस अककाळीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या पिकांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱयांना मिंधे सरकारकडून मोठय़ा मदतीची अपेक्षा आहे.