
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आणि त्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी परीक्षार्थींना निर्धारित वेळेच्या किमान अर्ध्या तासापूर्वी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद तसेच विद्वत परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा नियम लागू करण्यात आला आहे.
कक्षात प्रवेश करण्याआधी ओळखपत्र तपासणे, बैठक व्यवस्था, आवश्यक पडताळणी आणि इतर बाबींसाठी वेळ लागतो.
विद्यापीठाच्या विविध विभागांचे संचालक व प्रमुख, संलग्न, संचालित व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक तसेच विद्यापीठाच्या विविध उपपरिसरांचे समन्वयक व संचालक यांनी ही सूचना सर्व शिक्षक आणि परीक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.




























































