
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. या निकालाच्या सुनावणीसाठी सर्व 9 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, या प्रकरणासाठी आणखी थोड वेळ लागेल, असे सांगत न्यायालयाने आता पुढील सुनावणीसाठी 20 जूनची तारीख दिली आहे.विशेष सीबीआय कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
गेल्या दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जाहीर होण्याची शक्यता होती. तब्बल 20 वर्षे सुरू असलेल्या या खटल्याच्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाच्या सुनावणीसाठी सर्व 9 आरोपी न्यायालयात उपस्थित होते.
प्रकरणातील मुख्य आरोपी माजी खासदार पद्मसिंग पाटीलही न्यायालयात आले होते. ते 86 वर्षांचे असल्याने तसेच प्रकती अस्वास्थामुळे ते रुग्णवाहिकेतून न्यायालयात आले होते. मात्र, या प्रकरणाच्या निकालासाठी आणखी थोडा वेळ लागेल असे सांगत न्यायालयाने आजही निकाल दिला नाही. आता या प्रकरणाची पुन्हा 20 तारखेला सुनावणी होणार आहे.



























































